Friday, August 27, 2010

Writer's Block (Marathi)

कविता आजकाल सुचतेय कुठे?

मनाला पालवी फुटतेय कुठे?

आतुरतेने पाहते मी प्रेर्णेची वाट

पण पावसात मन भिजतेय कुठे?

आनंदाचा स्पर्ष मनाला पोहोचेना

हास्याचे वजन ओठांना पेलवेना

मनाने जणु मिटून घेतलेत डोळे

प्रकाशात देखिल वाट दिसतेय कुठे?